काजू बागायतदार १६ फेब्रुवारी रोजी सकाळी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन छेडणार

सावंतवाडी दि.१५ फेब्रुवारी 
काजू बागायतदार उद्या शुक्रवार दि.१६ फेब्रुवारी रोजी सकाळी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन छेडणार आहेत. काजू बी ला प्रतिकीलो २०० रूपये हमीभाव मिळावा अशी मागणी आहे.
सावंतवाडी दोडामार्ग बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, सुरेश गावडे, प्रकाश वालावलकर अशा बागायतदारांनी एकत्रित येऊन उद्या होणाऱ्या आंदोलनाचे नियोजन केले आहे
रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि चंदगड परिसरातील शेतकऱ्यांनी प्रति किलो दोनशे रुपये हमीभाव काजू बिला मिळावा म्हणून मागणी केली केली आहे गेल्या काही वर्षापासून काजू बी ला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे भात शेतीला पर्याय म्हणून काजू बागायती उभ्या राहिल्या असून शेतकरी यामध्ये आर्थिक दृष्ट्या सदन होतील अशी धारणा होती पिवळे सोने म्हणून काजूकडे पाहिले जायचे मात्र सध्या काजूला हमीभाव नाही आणि १२० किंवा १३० च्या वर प्रति किलो काजूला भाव मिळाला आहे त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे.