१४ जानेवारी रोजी कणकवली येथे गिरणी कामगारांचा भव्य मेळावा

0

मालवण दि .१२ जानेवारी

गिरणी कामगार व वारसदार न्याय हक्क संघटनेच्या वतीने गिरणी कामगार घरकुल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कोणताही भूमिपुत्र वंचित राहू नये यासाठी दि. १४ जानेवारी रोजी दु. ३ वा. प्रहार सभागृह कणकवली येथे भव्य गिरणी कामगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास सहनियंत्रक कमिटी म्हाडा चे सुनील राणे व आयोजक आम. नितेश राणे हे उपस्थिती राहून मार्गदर्शन करणार आहेत

या मेळाव्यामध्ये गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना मार्गदर्शन व मदती करिता प्रत्यक्ष मुंबई म्हाडाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व गिरणी कामगार वारसदार आणि बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गिरणी कामगार वारसदार न्याय हक्क संघटनेच्या अध्यक्षा सौ. रश्मी राजेंद्र लुडबे,,(मोबा 9421638287) उपाध्यक्ष संतोष पालव मालवण तालुकाध्यक्ष सौ. संजिवनी गांगनाईक , उपाध्यक्ष सौ. मीरा परब (कुडाळ)यांनी केले आहे.