बापर्डे येथे १५ रोजी २०-२० डबलबारी सामना!

मसुरे, दि.१५ फेब्रुवारी(झुंजार पेडणेकर)

देवगड तालुक्यातील बापर्डे येथील श्री ब्राह्मण देव मंदिरच्या वर्धापन दिनानिमित्त १५ फेब्रुवारी रोजी २०-२० डबलबारी भजन बारीचा सामना आयोजित करण्यात आला आहे. बाळ गोपाळ प्रसादिक भजन मंडळ कळवा ठाणेचे बुवा श्री संजय गावडे विरुद्ध श्री विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळ वाडा तालुका देवगडचे बुवा दुर्वास गुरव या दोघांमध्ये हा सामना होणार आहे. उपस्थितीचे आवाहन श्री ब्राह्मण देव मंदिर बापर्डे यांच्या वतीने करण्यात आले आहे.