मसुरे, दि.१५ फेब्रुवारी(झुंजार पेडणेकर)
श्री शांतादुर्गा देवी सभामंडप वडाचापाट पाटकरवाडी बंधुमंडळ यांच्या तर्फे होणारा वार्षिक जत्रोत्सव १७ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न होणार आहे. रात्रौ ८ वा. स्वयंभू आई श्री शांतादुर्गा देवीची विधिवत पूजा अर्चा, रात्रौ ठीक ८ वा. १५ मि. पाटकरवाडी बंधूमंडळ आणि आप्तेष्ट यांच्या वतीने ओटी भरणे आणि नवस फेडणे, रात्रौ ठीक ११ वा.वालावलकर दशावतार नाट्यमंडळ ओसरगांव यांचा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.