सिंधुदुर्गनगरी, दि.१५ फेब्रुवारी
अनुसूचित जाती, विजाभज (धनगर व वंजारीसही) विशेष मागास प्रवर्गातील आर्थिक कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होवून विवाह करणाऱ्या दांत्यांना कन्यादान योजना सुरु करण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे.
कन्यादान योजनेचे निकष –
1. सामुहिक विवाह सोहळयामध्ये भाग घेणाऱ्या मागासवर्गीय दांपत्यांना वस्तु स्वरूपात देण्यात येणाऱ्या अनुदान रू.20,000/- इतकी रक्कम वधूचे वडील, आई किंवा पालकांच्या अधोरेखित धनादेशाद्वारे (क्रॉस चेकने) लग्नाच्या दिवशी देण्यात यावी.
2. सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या पात्र स्वयंसेवी संस्थांना प्रती जोडप्यामागे रु.4000/- प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात यावे. यासाठी 3 महिन्यांच्या आत विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. विवाह नोंदणी झाल्यानंतर रक्कत अधोरेखित धनादेशाद्वारे देण्यात येईल.
3. या सामुहिक विवाह सोहळ्याकरीता किमान 10 जोडपी असणे आवश्यक राहील. 4. या योजनेचा लाभ फक्त प्रथम विवाहासाठी आहे. तथापि विधवा महिलेस दुसऱ्या लग्नाकिरता सुध्दा अनुज्ञेय राहील.
5. स्वयंसेवी संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असली पाहिजे. तसेच अर्ज सादर करताना सदरहू नोंदणी प्रभावी असली पाहिजे. त्याचप्रमाणे स्वयंसेवी संस्था यांच्याविरूध्द कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदविला किंवा न्यायालयीन प्रकरण नसले पाहिजे.
तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.