कृषी व विमा कंपन्यांच्या चुकीच्या कारभारामुळे काजू पीक विम्यापासून वंचित

मंत्री दीपक केसरकर यांनी यशस्वी शिष्टाई केल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर

सावंतवाडी, दि.१५ फेब्रुवारी
कृषी व विमा कंपन्यांच्या चुकीच्या कारभारामुळे काजू पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या माडखोल मंडळातील नऊ गावांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी अधिकारी तसेच विमा कंपनीला दिले आहेत या संदर्भात मंत्रालयात शेतकरी व कामगार संघटनेची बैठक कृषिमंत्री श्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यशस्वी शिष्टाई केल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर सांगितले.
श्री केसरकर यांनी यासंदर्भात आज येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांच्यासोबत माळकुलचे माजी सरपंच संजय राऊळ,ओवळीये माजी सरपंच विनायक सावंत आदी उपस्थित होते. श्री केसरकर पुढे म्हणाले माडखोल मंडळातील माडखोल,कलंबिस्त,वेर्ले,शिरशिंगे,
पारपोली,भोम,कारिवडे,ओवळीये,निरुखे आधी गावांना 2022- 23 ची काजू पीक नुकसान भरपाई पासून वंचित रहावे लागले होते ही नऊ गावे आंबोली मंडळाची न जोडता ती सावंतवाडी मंडळाची विमा कंपनी आणि कृषी अधिकार्याकडून जोडली गेल्याने हा प्रकार घडला होता. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते हे कोणाच्या संदर्भात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवून याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 26 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता परंतु शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात मंत्रालयात कृषिमंत्र्यासोबत खास बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले होते त्यामुळे सदरचे उपोषण स्थगित ठेवण्यात आले होते.
दरम्यान मुंबई येथे मंत्रालयात दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात खास बैठक कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ही उपस्थित होते यावेळी कृषी अधिकारी व विमा कंपन्यांचे अधिकारीही उपस्थित होते यावेळी झालेल्या चर्चेत शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही शेतकऱ्यांवर झालेला अन्याय आणि कृषी व विमा कंपन्यांची चूक निदर्शनास आणून दिली सदरची चूक लक्षात घेता मंत्रिमंडळ यांनी विमा व कृषी अधिकाऱ्यांना आदेश आवश्यक तो बदल करून शेतकऱ्यांना 15 ते 20 दिवसाच्या आत नुकसान भरपाई देण्याची सूचना केली यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्याचेही त्यांनी आदेश दिले काही विमा कंपन्यांचे नियम शिथिल करण्याचेही त्यांनी सांगितले एकूणच या सर्वांमध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची शिष्टाई ही कामी आली.
दरम्यान काजू पिकाला मिळणारा अल्प दर लक्षात घेता गोवा सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही काजू बागायतदारांना दोनशे रुपये इतका हमीभाव द्यावा अशी निवेदनही शेतकरी संघटनेच्या वतीने कृषिमंत्र्यांना देण्यात आले यावेळी ही मंत्री केसरकर यांनी कृषिमंत्र्या ंचे लक्ष वेधत शेतकऱ्यांची बाजू मांडली.