शासनाने आमची दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करुन आमरण उपोषण करण्याचा इशारा

वैभववाडी, दि.१५ फेब्रुवारी
गेले अकरा दिवस अरुणा धरणाच्या  कालव्याचे काम हेत किंजळीचा माळ पुनर्वसन गावठाणातील धरणग्रस्तानी बंद पाडले आहे. गुरुवारीही धरणग्रस्तांचे धरणे आंदोलन  सुरु आहे.  प्रशासनाकडून अदयाप धरणग्रस्तांना  विहीरीबाबत ठोस आश्वासन मिळाले नाही.  त्यामुळे धरणग्रस्तांनी जोपर्यंत विहीरीचे काम सुरु होत नाही. तोपर्यंत कालव्याचे काम सुरु देणार नाही. या भूमिकेवर ठाम असून प्रकल्पस्थळी अबालवृध्द महिला ठाम मांडूण आहेत. शासनाने आमची दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करुन आमरण उपोषण करण्याचा इशारा या आदीच धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे  दिला असून आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.
हेत किंजळीचा माळ पुनर्वसन गावठाणातील पाणी प्रश्न व अन्य समस्यांकडे लक्षवेधण्यासाठी येथील  धरणग्रस्तांनी  सोमवार दिनांक ५ फेब्रुवारीपासून धरणग्रस्तांनी प्रकल्पस्थळी जाऊन  कालव्याचे काम बंद पाडले आहे. या अगोदर  धरणग्रस्तांसोबत कार्यकारी अभियंता हर्षल यादव, उपअभियंता श्री मगरे यांनी प्रकल्पस्थळी येऊन धरणग्रस्तांशी चर्चा केली. सध्या असलेल्या विहीरीतुन पंप दुरुस्त करुन पाणी पुरवठा सूरु करतो असे सांगीतले. माञ सदर विहीरीचा रितसर ताबा दया अन्यथा आम्हांला नवीन विहीर खोदुन दया. अशी मागणी लावून धरली. तर नवीन विहीरीसाठी प्रस्ताव केला आहे. असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. माञ जोपर्यंत विहीरीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही. तोपर्यंत धरणा संबंधित कोणतेही काम आम्ही करु देणार नाही. अशी आक्रमक भूमिका असून या भूमिकेवर आंदोलनाच्या अकराव्या दिवशी धरणग्रस्त ठाम आहेत. जर शासनाने दखल घेतली नाही तर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. या आंदोलनात
माजी सरपंच सुरेश नागप, शिवाजी पडीलकर, सुनिल नागप, विजय नागप, महादेव नागप, मानाजी घाग, धोंडू नागप, विनोद नागप, परशुराम पडीलकर,  यांच्यासह धरणग्रस्त उपस्थित होते.