हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवू,त्यात फारकत घेणार नाही असे प्रतिज्ञापत्र सादर करतील का? माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

0

सावंतवाडी, दि .१२ जानेवारी
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवू,त्यात फारकत घेणार नाही असे प्रतिज्ञापत्र ४२ आमदार जनतेच्या न्यायालयात सादर करतील का? याचं उत्तर द्यावे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बोलावं असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.

साळगावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,सरसेनापती हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना हुकुमशहा म्हणणाऱ्यांची शिवसेना झाली. सज्जन सालस प्रतिवता निष्कलंक ऐश्वर्या संपन्न व्यक्तिमत्त्वांचा हातामध्ये शिवसेना न्यायालयाने शिवसेना सोपवली.हा त्यांचा न्याय झाला आता हे ४२ आमदार बाळासाहेबांचा विचार पुढे नेतील असं सांगून बाहेर पडलेले आहेत ते ४२ जणही आम्ही शेवटपर्यंत बाळासाहेबांचा विचार जोपासू असं अॅफिडेव्हिट जनतेच्या न्यायालयात सादर करतील करतील काय? मराठी भाषा, शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांना याची उत्तर द्यावी लागतील असे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी म्हटले आहे.