कणकवली विश्रामगृहावर ठाकरेंचे आ.वैभव नाईक,बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट…

राजकीय चर्चांना उधाण ; गुप्त बैठकीत काय चर्चा ?

कणकवली दि.१६ फेब्रुवारी(भगवान लोके)

: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री,भाजपा नेते,सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची कणकवली विश्रामगृहावर गुप्त भेट झाली आहे.त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.या गुप्त बैठकीत राजकीय किंवा विकासात्मक कामे यावर चर्चा झाली ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री,सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण हे काल सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते.काही अधिकाऱ्यांसोबत कणकवली येथील शासकीय विश्रामगृहावर आढावा बैठक आयोजित केली होती.त्यावेळी आ.वैभव नाईक यांनी पालकमंत्र्यांच्या भेटीला आलेत.बंद दाराआड काही वेळ ना. रविंद्र चव्हाण आणि आ
वैभव नाईक यांच्यात काही वेळ चर्चा झाली.या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.