दुर्गम भागात पोहोचून विद्यापीठ शास्त्रज्ञ व कृषी विभागाचा शेतकऱ्यांशी सवांद.

सावंतवाडी,दि.१६ फेब्रुवारी

कॅश्यू व कोकोनट बोर्ड, कोचीन केरळ, कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ फेब्रुवारी रोजी जि. प. मराठी शाळा, असनिये येथे शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले.

सदर प्रशिक्षणासाठी उपविभागीय कृषी अधिकारी, सावंतवाडी पी. पी. पाटील, तालुका कृषी अधिकारी, सावंतवाडी जी. एस. गोरे यांच्यासह कीटकशास्त्रज्ञ डाॅ. देसाई , श्री. सनस सर कृषी उद्यान वेत्ता, श्री. गोरिवले सर संशोधन सहाय्यक तसेच श्री. गोळवणकर सर व संशोधन सहाय्यक प्रादेशिक फळसंशोधन केंद्र,वेंगुर्ला व त्यांची संपूर्ण टीम आणि बांदा मंडळ, कृषी अधिकारी श्री. भुईंबर, श्री. घाडगे, श्री. निकम, श्री. माळी, श्रीम. वसकर, श्रीम. बेळगुंदकर यांचेसह असनिये सरपंच श्रीम. रेश्मा सावंत आणि घारपी, असनिये, तांबुळी गावचे एकूण १६० शेतकरी उपस्थित होते.
शेतक-यांच्या सर्व शंकाचे निरसन झाल्याचे शेतक-यांकडून बोलले गेले. प्रस्तावना व आभार कृप श्री. घाडगे यांनी केले तर सखोल मार्गदर्शन काजू, आंबा, नारळ, सुपारी तसेच रोपवाटिका व्यवस्थापन, शेतीशाळा वर्गाचे आयोजनासह तेलबिया प्रकल्पातंर्गत कोकम, भुईमूग प्रक्रिया व व्यवस्थापन, काजूमध्ये संजिवकाचा वापर आणि प्रक्रीया उद्योग अनुक्रमे श्री. देसाई, श्री.सणस, श्री. गोरिवले, भुईंबर व सरगुरू यांनी केले.
या कार्यक्रमाची संपूर्ण धूरा शाळा व्यवस्थापन, असनियेचे दादा सावंत, ध्वनी व्यवस्थापक श्री. शेटकर, कृषी मित्र हरी गावडे, व कृषी सहाय्यक मिलिंद निकम यांनी सांभाळली.