ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी आणि सर्व तालुका कार्यकारिणीची संयुक्त विशेष सर्वसाधारण सभा उद्या शनिवारी १३ जानेवारी रोजी

0

तळेरे, दि .१२ जानेवारी

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी आणि सर्व तालुका कार्यकारिणीची संयुक्त विशेष सर्वसाधारण सभा शनिवार दि.१३ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता कणकवली गोपुर आश्रम, पर्यटन निवास केंद्र नाईक पेट्रोल पंपाच्या मागे
या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक उपस्थित राहणार आहेत.

तरी या सभेला सर्व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व सर्व तालुकाध्यक्ष, तालुका सचिव, तालुका कार्याध्यक्ष सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी उपस्थित रहावे असे आवाहन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंदार काणे व जिल्हा सचिव अर्जुन परब यांनी केले आहे.