आता दुपारी नव्हे तर सकाळीच दवाखाना होणार सुरु ; आ.नितेश राणेंच्या पाठपुराव्याला यश…
कणकवली दि. १६ फेब्रुवारी ( भगवान लोके )
महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या माध्यमातून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी योजना अस्तित्वात आणण्यात आली.मात्र,वेळ दुपारी २ ते १० वाजता अशी होती, त्यावेळेत आ.नितेश राणे यांनी रुग्णांच्या मागणीनंतर बदल करण्याची मागणी केली होती.त्यानुसार शुक्रवार १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजल्यापासून आपला दवाखाना सुरु झाला आहे.त्यामुळे गोरगरीब रुग्णांसाठी दिलासा मिळणार आहे.आ.नितेश राणेंच्या सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.