देवगडचे नूतन पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांची सावंतवाडी येथे तडकाफडकी बदली

देवगड, दि.१६ फेब्रुवारी

देवगड पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी काही दिवसापूर्वीच देवगड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता.परंतु त्यांची अचानक तडकाफडकी बदली सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून देवगड पोलीस ठाण्याचा पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी स्वीकारला आहे.