सावंतवाडी तालुका यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे आयोजन

सावंतवाडी, दि.१६ फेब्रुवारी
कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवार. दि.,१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे आम्ही भारतीय सावंतवाडी, श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी , बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आणि सर्व धर्मीय सजग नागरिक सावंतवाडी तालुका यांच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकहितवादी पक्ष संविधान वादी संघटना आणि लोकशाही मानणाऱ्या तमाम शिवप्रेमी बंधू आणि भगिनीने या जयंती कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी प्रमुख उपस्थिती
जेष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई,
फादर मिलेट(ख्रिश्चन धर्मगुरु),आयु.तेजबोधी( बौद्ध धर्मगुरू)
श्री.रफिक मेमन (मुस्लिम प्रतिनिधी )
श्री.प्रसाद पावसकर (अध्यक्ष श्रीराम वाचन मंदिर),ऍड.देवदत्त परुळेकर,डॉ. *विजयालक्ष्मी चिंडक,कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड.संदीप निंबाळक( जेष्ठ वधीज्ञ )
सूत्रसंचालन श्री.महेश परुळेकर करतील.