काजूला दोनशे रुपये हमीभाव मिळाला पाहिजे जगभरातून येणाऱ्या काजू आयातीवर लगाम घालावा

आंदोलनाची कल्पना देऊन देखील तहसीलदार नसल्याने शेतकरी बांधवानी नाराजी व्यक्त;राजकीय लोकप्रतिनिधी विरोधात नाराजीचा सूर

दोडामार्ग, दि.१६ फेब्रुवारी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी यांच उदरनिर्वाह साधन काजू, तसेच नारळ सुपारी, इतर फळ आहे. दोडामार्ग तालुक्यातील काजू ही उच्च दर्जाची समजली जाते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार तालुक्यात काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. असे असताना गेल्या काही वर्षांत
काजूला कवडी मोल दर देऊन शेतकरी बांधवानी एक प्रकारे फसवणूक केली जात असताना राज्य सरकार या सरकार मधिल मंत्री लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक कोकणातील शेतकरी यांच्या सयस्याकडे डोळेझाक करत आहेत. अनेक ठिकाणी परदेशातून येणारी काजू कमी दराने घेऊन स्थानिक शेतकरी यांची काजू असे भासवून विक्री केली जाते. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी यांच्या काजूला दोनशे रुपये हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी दोडामार्ग तालुक्यातील शेकडो शेतकरी बांधवानी दोडामार्ग तहसीलदार कार्यालय येथे धरणे आंदोलन करत रोष व्यक्त केला. सरकारने तातडीने याकडे लक्ष दिले नाही तर उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला.