माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचा ७५ वा वाढदिवस राजकारण विरहित सर्वपक्षीयांच्या उपस्थिती साजरा केला जाणार

सावंतवाडी,दि.१६ फेब्रुवारी 
राष्ट्रवादीचे नेते ,माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचा ७५ वा वाढदिवस राजकारण विरहित सर्वपक्षीयांच्या उपस्थिती साजरा केला जाणार आहे .हा कार्यक्रम येत्या १९ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता राणी पार्वती देवी महाविद्यालयाच्या हॉलमध्ये होणार आहे अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रवीणभाई भोसले मित्र मंडळाच्या वतीने जेष्ठ नेते विकास सावंत यांनी दिली. यावेळी या वाढदिवसाला उपस्थित राहून श्री भोसले यांना शुभाशीर्वाद द्यावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्री सावंत यांनी आज सावंतवाडीत पत्रकार परिषद घेतली यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अँड दिलीप नार्वेकर, राष्ट्रवादीच्या नेत्या सौ अर्चना घारे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, देवा टेमकर ,सायली दुभाषी आदी उपस्थित होते.
यावेळी श्री सावंत पुढे म्हणाले,या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सावंतवाडी संस्थानचे राजे खेम सावंत भोसले उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थिती माजी केंद्रीय कायदामंत्री अँड रमाकांत खलप उपस्थित असणार आहे.हा वाढदिवस राजकीय स्वरूपाचा नसून हे सर्व पक्षाचे नेते पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे तसेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या वाढदिवसाला उपस्थित राहून श्री भोसले यांना शुभाशीर्वाद द्यावे असे आवाहन देखील प्रविण भाई मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान १९ फेब्रुवारी रोजी प्रवीण भोसले हे आपल्या तिरोडा येथील मूळ घरी सकाळी असतील त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व नागरिकांनी सायंकाळी पाच वाजता आरपीडी हायस्कूल येथे उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.