सलग १५ वर्षे माऊली कर्णबधिर शाळेचा निकाल १०० टक्के.

सर्वच कर्णबधिर विद्यार्थ्यांनी मिळवली अ श्रेणी.

सावंतवाडी, दि.१६ फेब्रुवारी

शासकीय रेखाकला एलिमेंटरी ग्रेड परिक्षेत माऊली महिला मंडळ शिरोडा संचलित माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय, आरोस-दांडेली या शाळेचा १००% निकाल लागला. या शाळेतून एकूण तीन विद्यार्थी एलिमेंटरी परिक्षेस बसले होते. तीनही मुलानां अ श्रेणी मिळाली. यामध्ये इयत्ता पाचवीची विद्यार्थीनी कु. निकिता निलेश चव्हाण हिला अ श्रेणी. पाचवीचा विद्यार्थी कु. शशांक सुनील काळसेकर याला अ श्रेणी. तर सहावीचा विद्यार्थी कु. सक्षम रामचंद्र वाडकर यानेही अ श्रेणी मिळवली. सदरची मुले ही कर्णबधिर असूनही नॉर्मल विद्यार्थ्यांमधून परीक्षा देऊन त्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे उपक्रमशील कलाशिक्षक बाळासाहेब आबाजी पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्व १००% अ श्रेणी मिळवलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे व कलाशिक्षकाचे संस्थेच्या व शालेच्या वतीने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

शाळेचा १००% निकाल व अ श्रेणीचा १००% निकाल लावणारी महाराष्ट्रातील माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय हे अग्रेसर आहे. या विद्यार्थ्यांना संस्थेच्या अध्यक्षा सौ. रेखाताई गायकवाड वे मुख्याध्यापक सतीश उकरंडे याचे सहकार्य लाभले. या कर्णबधिर मुलांनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या बतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.