ज्येष्ठ नागरिकांनी लुटला सहलीचा आनंद

मालवण,दि.१६ फेब्रुवारी

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आडवली मालडीची देवदर्शन सहल उत्साहात पार पडली. या सहलीत गणपतीपुळेसह अन्य धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेटी देत सहलीचा आनंद लुटला.

या सहलीत आडिवरे येथील महाकाली मंदिर, कशेळी येथील कनकादित्य मंदिर, पावस स्वामी स्वरुपानंद मठ, रत्नदुर्ग किल्ला, रत्नागिरी मत्स्यालय गणपतीपुळे मंदिर, नाणिज येथील नरेंद्र महाराज मठ इ. स्थळांना भेट दिली. यामध्ये ४७ ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. रात्री उशिरापर्यंत सर्व ज्येष्ठांचा उत्साह कौतुकास्पद होता. या सहलीत सहभागी सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या चहा-नाश्त्यासाठी उमाजी कोयडे, महादेव चव्हाण यांनी आर्थिक सहकार्य केले. हा उपक्रम प्रत्यक्षात येण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आडवली-मालडीचे अध्यक्ष आप्पाजी साटम, उपाध्यक्ष एकनाथ लाड, खजिनदार बाबुराव साटम, सीमा घाडीगावकर आदींनी मेहनत घेतली.