केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेच्या मालवण,दि.१६ फेब्रुवारीमाध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाश्वत पर्यटन विकासासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे मत पर्यटन मंत्रालय प्रकल्प समन्वयक मंदार हाडके यांनी तोंडवळी येथे बोलताना केले.
केंद्र सरकारने भारतातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी देशातील ५८ जिल्ह्याची निवड केली असून महाराष्ट्र राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात आली असून सदर योजना स्वदेश २.० या नावाने कार्यान्वित करण्यात आली असून जिल्ह्यातील शाश्वत पर्यटनासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून नियोजनबद्ध सुरूवात झाली आहे. यानुसार जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील हॉटेल, होम स्टे, अॅग्र टुरिझम, रिसॉर्ट क्षेत्रातील पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी निधी पोर्टल रजिस्टर माहितीसाठी जिल्ह्यातील नित्यानंद प्राईड रिसॉर्ट, तोंडवळी मालवण येथे पर्यटन व्यावसायिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये प्रकल्प समन्वयक मंदार हाडके यांचा तोंडवळी येथील पर्यटन व्यावसायिक व माजी सरपंच आबा कांदळगावकर यांच्या हस्ते सत्कार आला.
यावेळी मंदार हाडके म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा केंद्रीय स्वदेश दर्शन पर्यटन योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील शाश्वत पर्यटन विकासासाठी कार्य होणार असून स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या समन्वय साधून कार्य केले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी स्वदेश दर्शन समिती सदस्य तथा पर्यटन व्यवसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू मोंडकर यांनीही मार्गदर्शन केले.
या बैठकीत स्थानिक जिल्ह्यातील ४० पेक्षा जास्त व्यवसायिकांनी यामध्ये सहभाग घेतला. यावेळी तारकर्ली पर्यटन विकास संस्था अध्यक्ष सहदेव साळगावकर, रवींद्र खानविलकर, आबा कांदळगीकर, अवि सामंत यांनी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन संजय केळुसकर यांनी केले. यावेळी माजी सरपंच सागर मालंडकर, आशिष पाटील, उपसरपंच हर्षद पाटील, आनंद झाड, मनिष कट्टी, उमा टिकम, प्रणित शेलटकर, गुरु राणे, जिजा टेमकर, ओमकार तोंडवळकर, दर्शन वेंगुर्लेकर आदी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.