सुंदर भाटले येथे ‘शिव अघोरी संग्राम‘

वेंगुर्ला,दि.१६ फेब्रुवारी

गणेश जयंती निमित्त सुंदर भाटले येथे गणपतीचे पूजन करण्यात आले असून १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता श्री विघ्नहर्ता रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ (निगुडे-बांदा) यांचा ‘शिव अघोरी संग्राम‘ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी नाट्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव वांद्रेश्वर प्रासादिक कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळातर्फे केले आहे.