आम.नितेश राणे यांच्या संकल्पनेतून २४ रोजी ‘कोकणचा सन्मान’ मिम्स व रिल्स स्पर्धा

येवा कोकण आपलोच आसा’ या टॅगलाईनखाली युट्युबर्स, एन्फ्ल्यूएंझर्सना प्रोत्साहन; कोकणचे सौंदर्य जगात पोहोचविणार

कणकवली १६ फेब्रुवारी (भगवान लोके)

‘सन्मान कोकणचा, कोकणकरांचा, येवा कोकण आपलोच आसा’ या टॅगलाईनखाली
युट्युबर्स, एन्फ्ल्यूएंझर्स असून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने ‘कोकणचा सन्मान’ या मिम्स रिल्स स्पर्धेचे आयोजन २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वा. हॉटेल निलम्स कंटीसाईड येथे करण्यात आले आहे.अशी माहिती
आमदार नितेश राणे यांनी दिली.

कणकवलीत प्रहार भवन येथे आयोजीत पत्रकार परिषदेत आम.नितेश राणे बोलत होते.ते म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्विप व मालदिवला भेट दिल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष तिकडे वळलेले आहे. लक्षद्विप व मालदिवच्या सौंदर्यपेक्षाही अधिक कोकण सुंदर आहे. हे कोकणचे सौंदर्य मिम्स व रिल्सच्या माध्यमातून आपण अधिक प्रभावीपणे पोहोचवू शकतो. कोकणातील असे अनेक युट्युबर्स, एन्फ्ल्यूएंझर्स असून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने ‘कोकणचा सन्मान’ या मिम्स स्पर्धेचे आयोजन २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वा. हॉटेल निलम्स कंटीसाईड येथे करण्यात आले आहे.
आम.नितेश राणे म्हणाले, कोकणचे सौंदर्य आपण अधिक प्रभावीपणे समोर कसे आणू शकतो, याचा विचार केला असता युट्युब हे प्रभावी माध्यम आहे. कोकणातील अनेक युट्युब क्रिएटर कोकणातील विविध विषय प्रेझेंट करत असतात. युट्युबर्सची फॉलोअर्सच्या माध्यमातून एक वेगळी ताकद निर्माण केलेली आहे. कोकणातील या युट्युबर्स, एन्फ्ल्यूएंझर्सना एकत्रीत आणून मिम्स, रिल स्पर्धा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आलेली आहे.

सिंधुदुर्गमधील हे सौंदर्य युट्युबच्या माध्यमातून जगासमोर यावे यासाठी सदच्या युट्युबर्स, एन्फ्ल्यूएंझर्सना प्रोत्साहीत करण्यासाठी २४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ वा. निलम्स कंट्रीसाईडच्या लॉनवर हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम निमंत्रीतांसाठी असणार असून इतरांना पाहण्यासाठी त्याची ऑनलाईन लिंक देण्यात येणार असून सर्वजण या लिंकच्या माध्यमातून कार्यक्रम पाहू शकतात, असेही आम. नितेश राणे म्हणाले.

या स्पर्धेच्या अनुषंगाने १८ फेब्रुवारी २०२४ रोजी एका क्रिएटिव्ह पोस्टरद्वारे एक मोबाईल नंबर जाहिर करण्यात येणार आहे. त्यावर क्रिएटर्सनी आपले रिल्स, मिम्स पाठवावयाचे आहेत. यासाठी अंतीम तारीख २० फब्रुवारी असणार आहे. तर दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वा. पर्यंत वोटींग लाईन सुरू असणार आहेत. या कार्यक्रमासाठी स्टार क्रिएटर्स अंकिता प्रभूवालावलकर, गौरी पवार, सिद्धांत जोशी, मंगेश काकड, वृषाली जावळे, सोहन शहाणे, गणेश बनारे, प्रसाद विधात, कुहू परांजपे, श्रुतिक कोळंबेकर, प्रशांत नाकती, शंतनू रांगणेकर आदींना आमंत्रित करण्यात येणार आहे. जिल्हयातील सौंदर्य, पर्यटन वाढविणे या दृष्टीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून युटुबर्सनी सहभागी व्हावे, असे आवाहन आम.नितेश राणे यांनी केले.