जामसंडे सन्मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक माघी गणेशोत्सव उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
देवगड,दि.१६ फेब्रुवारी
जामसंडे सन्मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक माघी गणेशोत्सव उत्सवानिमित्त उद्योजक नंदकुमार घाटेयांनी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले.यावेळी उद्योजक नंदकुमार घाटे यांनी श्रीची विधिवत पूजा करून गणरायाच्या स्थापनेपासूनच्या विविध जुन्या गोष्टींना उजाळा देखील दिला
माघी गणेशोत्सवानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन यावेळी मोठ्या संख्येने गणेश भक्तांनी हजेरी लावून बाप्पाचे दर्शन घेतले यावेळी या पाच दिवसात विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील,बंड्या भडसाळे,प्रकाश लाड, शरद शिंदे,डॉ.अरुण गुमास्ते आदी उपस्थित होते.