रस्त्यासाठी १ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी ; ग्रामस्थांच्यावतीने आ. नितेश राणेंचा सत्कार
कणकवली दि. १६ फेब्रुवारी ( भगवान लोके )
कणकवली तालुक्यातील असलदे येथील देवगड निपाणी रोड ते गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर पावणादेवी मंदिर रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरण कामाचे भुमिपुजन व कामाचा शुभारंभ आ. नितेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या रस्त्यासाठी रु. १ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी मंजुर करुन दिल्याबद्दल आ.नितेश राणे यांचा असलदे सोसायटी व ग्रामस्थांच्यावतीने सरपंच चंद्रकांत डामरे , चेअरमन भगवान लोके, माजी सरपंच पंढरी वायंगणकर,मानकरी विश्वनाथ परब, अनंत घाडी यांच्या हस्ते शाल व पुच्छगुच्छ,भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी खरेदी विक्री संघ संचालक पंढरी वायंगणकर, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, असलदे सोसायटी चेअरमन,पत्रकार भगवान लोके, नांदगांव सरपंच भाई मोरजकर,रामचंद्र लोके गुरुजी, सोसायटी व्हाईस चेअरमन दयानंद हडकर, संचालक शामू परब, परशुराम परब, शत्रुघ्न डामरे, प्रकाश खरात, उदय परब, पत्रकार अनंत पाताडे,भालचंद्र साटम, हर्षदा वाळके, सुरेश मेस्त्री, बाबाजी शिंदे, सुभाष परब,संतोष घाडी, अजय घाडी, महेश लोके, संतोष जाधव, संतोष परब, प्रशांत परब, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर खोत, सतिश पोकळे, श्रीराम मोरजकर, आत्माराम घाडी,माजी सरपंच अंकुश डामरे, मधु परब, पोलिस पाटील सावित्री पाताडे, रज्जाक बटवाले,महादेव परब,मारुती घाडी,सुरेश परब ठेकेदार तेजस चव्हाण,विजय परब, अब्बास बटवाले,विनायक मिठबावकर आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी नितेश राणे म्हणाले , असलदे गावातील या रस्त्यासाठी भाजपाच्या माध्यमातून निधी मंजूर झाला आहे.गावासाठी लागणारा निधी आम्ही देणार आहोत. या रस्त्याच्या पुढील भागातील कामासाठी वेगळा निधी दिला जाईल. भाजपाच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लावली जातील , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.