मालवण,दि.२२ एप्रिल
मालवण तालुक्यातील नांगरभाट येथील श्री भवानी मंदिरात क्षत्रिय गडकरी मराठा पोफळे परिवार, मुंबई यांच्या वतीने पांजी महोत्सव दि. ६ मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याय आले आहे
यानिमित्त दि. ४ मे रोजी सायंकाळी ५ वाजत लोपाचार, दि. ६ मे रोजी सकाळी ८ वाजता देवीला पाचारण करण्यासाठी हाक दिली जाईल, यावेळी सर्व पोफळे भावकी परिवार उपस्थितीत पुढील कार्यक्रम देवीच्या आज्ञा ने पार पडतील. दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. महिलासाठी हळदीकुंकू समारंभ सायं. ७ वा. हरिपाठ व महाआरती, रात्री १० स्थानिक सुस्वर भजन सादर होणार आहे. ९ मे रोजी सकाळी ८ वाजता पुजायुक्त ब्राह्मण भोजन आदी कार्यक्रम होणार आहेत. या उत्सवास उपस्थित राहावे, अधिक माहितीसाठी प्रकाश पोफळे ८३६९८०७५१६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोफळे भवानी मंदिर कार्यकारी मंडळातर्फे करण्यात आले आहे.