सिंधुदुर्गातील युवा जादूगार केतन सावंत यांना “इंटरनॅशनल एक्सनल्स अवॉर्ड” देऊन सन्मानित

0

सावंतवाडी, दि .१२ जानेवारी
पनवेल येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर विचार मंचच्या वतीने सिंधुदुर्गातील युवा जादूगार केतन सावंत यांना “इंटरनॅशनल एक्सनल्स अवॉर्ड” देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार सिरंगा आप्पा बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, झी चोवीस तासचे मुख्य संपादक निलेश खरे, तुफान लोकप्रिय अलबत्या गलबत्या या नाटकातील अभिनेते निलेश गोपनारायण, एडवोकेट मंगेश नेने, विवेक देशपांडे ,डॉ. शुभदा जगदाळे आदिंसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.