सिंधुदुर्ग,दि.१६ फेब्रुवारी ( भगवान लोके )
खाणकामामुळे बाधित क्षेत्राच्या विकासाकरिता सिंधुदुर्ग जिल्हा खनिज प्रतिष्ठान ट्रस्ट च्या नियामक परिषद समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार विनायक राऊत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खाणकामामुळे बाधित क्षेत्र व व्यक्तींच्या विकासाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खनिकर्म निधीतून विकास कामांच्या प्राप्त प्रस्तावावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच विकास कामांचा आढावा घेण्यात आला.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म विभागाचे अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.