आमदार नितेश राणे यांनी सरपंच उपसरपंच ग्रा. पं. सदस्यांसह लोरेवासियांचे केले अभिनंदन;लोरे नं.१ ग्रामपंचायतला मिळणार ५० लाखांचा विकासनिधी
कणकवली दि.१६ फेब्रुवारी(भगवान लोके)
राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्काराने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, उपमुख्यकार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे ,माजी आमदार राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ओरोस येथे आज सन्मानित करण्यात आले. सरपंच अजय तुळशीदास रावराणे, तत्कालीन ग्रामसेवक ऋतुराज कदम यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, माजी पं स सभापती मनोज तुळशीदास रावराणे , उपसरपंच सुमन गुरव ,ग्रा पं सदस्य नरेश गुरव, सौ.सारिका रावराणे,सौ समीक्षा मोसमकर, सतिश कासले, सुनिल रावराणे, अनंत रावराणे, संजय खाडये,हरिश्चंद्र जाधव, सदानंद गुरव, विजयसिंह रावराणे, सचिन सावंत,स्वप्नगंधा रावराणे, विजय गुरव,रवींद्र गुरव आदी उपस्थित होते.
सन 2021 -22 सालचा राज्य शासनाचा जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार कणकवली तालुक्यातील लोरे नं 1 ग्रामपंचायत ला जाहीर करण्यात आला होता. आज ओरोस येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर आमदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट सरपंच अजय रावराणे, उपसरपंच सुमन गुरव यांच्यासह सर्व ग्रा पं सदस्यांनी घेतली. आमदार नितेश राणे यांनीही पुष्पगुच्छ देत लोरे नं 1 ग्रामपंचायत कमिटी तसेच समस्त लोरेवासीयांचे अभिनंदन केले. जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाल्यामुळे लोरे नं 1 ग्रामपंचायत ला राज्य शासनाकडून 50 लाख रुपयांचा विकासनिधी विशेष बाब म्हणून मिळणार आहे.या माध्यमातून लोरेवासीयांना अत्यावश्यक सोयीसुविधा निर्माण करणार असून यापुढेही शासनाच्या उपक्रमांत अग्रेसर राहणार असल्याचे सरपंच अजय रावराणे यांनी सांगितले.