मालवण,दि.१६ फेब्रुवारी
चांगली कामे करण्यासाठी चांगली बुद्धी देखील असावी लागते. त्याच अनुषंगाने आज आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून तुळजाभवानी मंदिरासमोर मंडपाचे काम करण्यात आले आहे. आज शिवसेनेचे नाव, चिन्ह आणि झेंडा चोरांनी चोरून नेला. मात्र आम्हाला मिळालेले मशाल चिन्ह हे जगदंबेचेच अस्त्र असून दुष्ट विचारांचा नाश करण्यासाठी देवीच्या गोंधळात मशालच पेटवली जाते. त्यामुळे हे नावे अस्त्र आम्ही हाती घेतले असून लोकांनीही मशाल हृदयात ठेवावी असे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत यांनी येथे बोलताना केले.
आमदार वैभव नाईक यांनी उपलब्ध केलेल्या निधीतून मालवण वायरी येथील कुलस्वामिनी मंदिरासमोर उभारलेल्या सभामंडपाचे लोकार्पण खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आम. वैभव नाईक, ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, मंदार केणी, बाबी जोगी, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, सेजल परब, मनोज मोंडकर, श्वेता सावंत, मंदार ओरस्कर, दीपा शिंदे, उमेश मांजरेकर, मनोज मोंडकर, भाई कासवकर, तृप्ती मयेकर, पूनम चव्हाण, प्राची माणगावकर, माधुरी प्रभू, प्रदीप लुडबे, मधुकर लुडबे, कांता लुडबे, गणेश लुडबे, संतोष लुडबे, संजय लुडबे, राजन लुडबे, विश्राम लुडबे, तेजस लुडबे यांसह राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, ममता तळगावकर आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, वायरी ग्रामस्थ आज आंबा व्यवसाय, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. वायरीसह मालवणमध्ये विविध विकास कामे आपण मार्गी लावत आहोत. सिंधुदुर्ग किल्ल्यात शिवराजेश्वर मंदिरात सिंहासन बसविण्यासह मालवणात सुसज्ज जेटी उभारली आहे. मालवणच्या विकासासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, यापुढेही सातत्याने विकास कामे मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे आम. नाईक म्हणाले.
यावेळी लुडबे मंडळीतर्फे खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हरी खोबरेकर, साईनाथ चव्हाण यांनीही विचार मांडले. सूत्रसंचालन प्रभुदास आजगावकर यांनी केले.