शिवसेना आ.वैभव नाईक यांच्या निवासस्थाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त

चिपळुणातील घटनेनंतर कणकवलीत पोलीस बंदोबस्त वाढवला

कणकवली दि .१६ फेब्रुवारी(भगवान लोके)

भाजपा नेते,माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीवर चिपळुणात आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे चिपळुणात जोरदार राडा झाला . राणे आणि जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केला.त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आ.वैभव नाईक यांच्या निवासस्थाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तसेच कणकवली पटवर्धन चौक व अन्य ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे.कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप स्वतः पेट्रोलिंग कणकवली शहरात करीत आहेत.

शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांचा उद्धव ठाकरे यांच्या कणकवली दौऱ्याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे माजी खासदार निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका केली होती. त्यांचा समाचार घेण्यासाठी आपण त्यांच्या गुहागर मतदारसंघातच सभा घेऊ आणि तेथेच बोलू, असे त्यांनी जाहीर केले. त्यानुसार आज शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता निलेश राणे आणि समर्थक आणि भाजपा नेते हे भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर गेले.तेव्हा जोरदार दगडफेक सुरू झाली आणि राडा झाला.