कणकवली १६ फेब्रुवारी (भगवान लोके)
– यंगस्टार मित्रमंडळ कणकवली आयोजित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने प्रकाशझोतातील भव्य यंगस्टार चषक (वर्ष २८ वे) राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा शुक्रवार १५ मार्च २०२४ ते १७ मार्च २०२४ या कालावधीत भालचंद्र महाराज स्टेडियम बॅटमिंटन कोर्ट भालचंद्र महाराज आश्रम शेजारी आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील मुंबई, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सांगली या जिल्ह्यातील नामवंत निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत. तरी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शिवलिंग पाटील ९४२०६४९२६४, रुपेश वाळके ९९७५८५३५५५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील बक्षिसे प्रथम क्र. रोख रुपये ३५०२८/- व यंगस्टार चषक २ द्वितीय क्र. रोख रुपये २२०२८/- व यंगस्टार चषक तसेच अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट चढाई, पक्कड, शिस्तबद्ध संघ, अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येतील. या स्पर्धेसाठी प्रेक्षकांसाठी गॅलरी व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धक संघ व रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अण्णा कोदे व मंडळाचे सचिव नंदू वाळके यांनी केले आहे.