श्री संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी सोहळा निमित्त 26 रोजी

बांदा ,दि.२५ एप्रिल
वेत्ये खांबलवाडी येथील श्री ब्राम्हणदेव संत गोरा कुंभार समाज मंदिर येथे श्री संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी सोहळा निमित्त दिनांक 26 रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. निमित्ताने सकाळी नऊ वाजता श्री संत गोरोबाकाका मूर्तिपूजन, सकाळी 10 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी बारा वाजता आरती व तीर्थप्रसाद दुपारी एक वाजता महाप्रसाद, सायंकाळी सहा वाजता वेत्ये येथील वारकरी संप्रदाय यांचा हरिपाठ कार्यक्रम, सायंकाळी सात वाजता स्थानिक भजने, रात्री साडेनऊ वाजता बाळा सावंत दशावतार नाट्य मंडळ नेरूर असरोंडी यांचा दणदणीत गोकुळचा चोर हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री ब्राह्मणदेव कला क्रीडा मंडळ वेत्ये यांच्याकडून करण्यात आले आहे.