सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या उपस्थितीत झाली संपन्न
आचरा,दि.१६ फेब्रुवारी (अर्जुन बापर्डेकर)
आचरा गाउडवाडी केरकर घर तेयशवंत पांगे मांगरी रस्ता ,गाऊडवाडी स्मशानभूमी ते नाईक घर रस्ता, मुजावर कंपाउंड ते गाऊडवाडी गोलतकर घररस्ता या कामांचा शुभारंभ गाउडवाडी येथील जेष्ठ नागरिक आबा गावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आचरा सरपंच जेरॉन फर्नाडिस,उपसरपंच संतोष मिराशी, मालवण तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गांवकर, जयप्रकाश परुळेकर,सचिन हडकर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, ग्रामपंचायत सदस्य अनुष्का गांवकर यांसह अन्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते.