देवगड,दि.१७ फेब्रुवारी
तळेबाजार येथे श्री . देवी महालक्ष्मी मंदीराचा ३४ वा वर्धापदिन सोहळा दिनांक १७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे .
यानिमित्त शनिवार दि १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ०८ श्रीदेवी चरणी एकादशमी ( अभिषेक ) ,सकाळी १० वा आकारी ब्राम्हणदेव प्रासा . भजन मंडळ ,तळवडे खालची धुरीवाडी बुवा श्री . दिलीप लवू धुरी सकाळी १० ते११ .३० श्री . सत्यनारायण महापूजा , सकाळी ११ .३o ते १२ आरती व तिर्थप्रसाद ( समस्त धुरीमंडळी ) , सकाळी ११ .३० समई नृत्य ( श्री .ब्राम्हणदेव महिला मंडळ , नाद – भोळेवाडी ) प्रायोजक श्री . सुभाष शांताराम धुरी , दुपारी १२ ते ३ महाप्रसाद (सौजन्य श्रीम रूपाली धुरी , श्री . संदीप धुरी , श्री . संजय धुरी , श्री .बाबुराव बोडेकर ,दुपारी १ वाजता आमने सामने डबलबारी भजनांचा जंगी सामना बुवा श्री अभिषेक शिरसाट कोटेश्वर नवतरुण प्रा . भजन मंडळ हरकुळ बुद्रुक ता .कणकवली विरूद्ध बुवा श्री सचिन रामचंद्र कोयंडे, कोयंडे बंधु प्रा . भजन मंडळ , मुंबई सायन / कालवी देवगड यांच्यात रंगणार आहे . रात्री १० वा ऑकेस्ट्रा सारेगमप कोल्हापुर , तसेच नाटक सर्व नाथी स्वार्थासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
या सर्व कार्यक्रमांना सर्व भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त धुरी मंडळी , श्री . महालक्ष्मी सेवा मंडळी तळवडे , बागतळवडे , तळेबाजार तसेच गणेश उत्साही मंडळ , गणेश नवतरूण उत्साही मंडळ आणि ग्रामस्थ , तळेबाजार यांनी केले आहे .