ग्राहकांचे हित जोपासणारया मालवणी बझारचा उपक्रम स्तुत्य –सरपंच जेरॉन फर्नांडिस

आचरा,दि.१७ फेब्रुवारी(अर्जुन बापर्डेकर)
ग्राहकांचे हित लक्षात घेऊन मिरची महोत्सवासारखे विविध ग्राहकोपयोगी उपक्रम राबविणारया मालवणी बझारचे उपक्रम स्तुत्य असल्याचे मत आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी व्यक्त केले.
मालवणी बझार तर्फे आयोजित मिरची महोत्सवाचे उद्घाटन सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत माजी सभापती निलिमा सावंत, उपसरपंच संतोष मिराशी, मालवणी बझार संचालक आडारकर, हनुमंत प्रभू,आचरा व्यापारी संघटनेचे अर्जुन बापर्डेकर, विद्यानंद परब,सचिन हडकर, तसेच ग्राहक अशोक घाडी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना निलिमा सावंत यांनी महिलांना परवडणारया दरात मिरची उपलब्ध करुन दिल्या बद्दल धन्यवाद व्यक्त केले.आभार हनुमंत प्रभू यांनी मानले.