शहराच्या विकासासाठी येणाऱ्या ५ वर्षात नगरपंचायत होण्यासाठी प्रयत्न करू-आ. नितेश राणे

बांदा,दि.१७ फेब्रुवारी
बांदा ही जिल्ह्यातील महत्वाची बाजारपेठ आहे. बांदा गाव झपाट्याने शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आज केंद्रासह राज्यात महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे विकास कामांना निधी उपलब्ध होणे शक्य आहे. शहरात पर्यटक थांबले पाहिजे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शहर विकासाचे योग्य नियोजन करा. नावीन्यपूर्ण प्रकल्प उभे करा. शहराच्या विकासासाठी येणाऱ्या ५ वर्षात नगरपंचायत होण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी बांदा येथे दिले.
केंद्रीय सूक्ष्म मध्यम व लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून बांदा शहरासाठी कचरा संकलन गाडी उपलब्ध झाली आहे. त्याचे लोकार्पण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, सरचिटणीस महेश सारंग, माजी जि प सभापती प्रमोद कामत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळू सावंत, माजी सरपंच मंदार कल्याणकर, अशोक सावंत, दीपक सावंत, माजी पं. स. सभापती शितल राऊळ, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब उपस्थित होते.
आमदार नितेश राणे म्हणाले,
बांदा भाजपात कौटुंबिक वातावरण सलोख्याचे आहे. केंद्रात व राज्यात युतीची सत्ता आहे. नवनवीन विकास कामांचे प्रस्ताव सादर करा. आबाल वृद्धांच्या विरंगुळ्यासाठी गार्डन तयार करा. निधी देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. बांद्यात नागरिकांनी विश्वासाने भाजपकडे सत्ता दिली आहे. विकासकामातून नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवा, असे आवाहन केले.
यावेळी बांदा उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल बाळू सावंत, जिल्हा फेडरेशन वर बिनविरोध निवड झाल्याबद्दल मधुकर देसाई, यांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जि प सभापती गुरुनाथ पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर, लक्ष्मी सावंत, श्रेया केसरकर, रूपाली शिरसाट, प्रवीण देसाई, सिद्धेश महाजन, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, विलास पावसकर, विनेश गवस, आत्माराम गावडे, बाबा काणेकर, सिद्धेश पावसकर, मनोज कल्याणकर, अवंती पंडित, राखी कळंगुटकर, कैलास गवस, ग्रामविकास अधिकारी एल. व्हीं मोर्यें, लिपिक संजय सावंत उपस्थित होते.