सावंतवाडी दि.१७ फेब्रुवारी
आजगाव येथील पूज्य गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठानच्या दोन विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या ‘गणित प्राविण्य’ परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. वेदांत सुनिल देशमुख हा ६० गुणांसह वेंगुर्ला तालुक्यात प्रथम आला असून कु. प्रचिती विकास शेटये ही ५५ गुणांसह वेंगुर्ला तालुक्यात द्वितीय आली आहे. हे दोन्ही विद्यार्थी गुरुवर्य अ.वि.बावडेकर विद्यालय, शिरोडा येथे इयत्ता पाचवीत शिकत असून त्यांना प्रशालेसह प्रतिष्ठानचे शिक्षक विनय सौदागर यांचे पूर्ण वर्ष मार्गदर्शन लाभले. मुलांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून प्रतिष्ठान तर्फे त्यांना २४ फेब्रुवारीला सन्मानित करण्यात येणार आहे.