नमो चषक 2024 बुद्धीबळ स्पर्धेला उस्फुर्त असा प्रतिसाद
देवगड,दि.१७ फेब्रुवारी
भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित कणकवली विधानसभा मर्यादित नमो चषक २०२४ बुद्धीबळ स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार अजित गोगटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमित साटम,देवगड युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर,नगरसेवक शरद ठुकरूल, प्रियांका साळसकर, प्रणाली माने,मिलिंद माने,विश्वामित्र खडपकर, , महिला आघाडी अध्यक्ष उषःकला केळुसकर,खविस संचालक रेश्मा जोशी, कौस्तुभ जामसंडेकर,नरेश डांमरी, सदाशिव भुजबळ,माजी उपनगराध्यक्ष संजय तारकर, वैभव बिडये आदी उपस्थित होते.
पारितोषिक पुढील प्रमाणे,
खुला गट प्रथम क्रमांक : १००००/- चषक, व्दितीय क्रमांक: ५०००/- चषक,तृतीय क्रमांक: ३०००/- चषक, चतुर्थ क्रमांक: २०००/- चषक, पंचम क्रमांक : १०००/- चषक
१८ वर्षाखालील प्रथम क्रमांक : ५०००/- चषक व्दितीय क्रमांक : ३०००/- चषक तृतीय क्रमांक: २०००/- चषक,चतुर्थ क्रमांक : १०००/- चषक, पंचम क्रमांक : १०००/- चषक
महिला गट • प्रथम क्रमांक : ३०००/- चषक, व्दितीय क्रमांक: २०००/- चषक, तृतीय क्रमांक : १०००/- चषक,चतुर्थ,क्रमांक : ७००/- चषक,पंचम क्रमांक : ५००/- चषक देण्यात येणार असून या स्पर्धेमध्ये शंभरहून अधिक लहान मोठ्या स्पर्धकांनी सहभाग घेतला स्पर्धेला उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला आहे