सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सांस्कृतिक कला महोत्सव’ २०२४ च आयोजन

 महोत्सवाचा शुभारंभ सुप्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या मालवणी कविता गायन व नांदेड येथील प्रसिध्द गायक सुरमणी पं.धनंजय जोशी यांच्या स्वरमयी गीतान

सावंतवाडी दि.१७ फेब्रुवारी
सैनिक नागरी सहकारी पतसंस्था व श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सांस्कृतिक कला महोत्सव’ २०२४ च आयोजन करण्यात आलं आहे. याचा शुभारंभ शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा शुभारंभ सुप्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या मालवणी कविता गायन व नांदेड येथील प्रसिध्द गायक सुरमणी पं.धनंजय जोशी यांच्या स्वरमयी गीतान झाला.

मालवणी कवी दादा मडकईकर व प्रसिध्द गायक सुरमणी पं.धनंजय जोशी यांनी आपल्या बहारदार गीत गायनानं उपस्थित रसिक श्रोत्यांची मनं जिंकली. प्रथम सत्रात मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या ‘आबोलेचो वळेसार’ या मालवणी कवींतांचा कार्यक्रम पार पडला. दादांनी आपल्या खास शैलीतील मालवणी कवितांनी उपस्थितांना असल्ल मालवणी संगीतरजनीचा आनंद दिला. तर दुसऱ्या सत्रात अभंग व नाट्यगीतांची सुरेल मैफील रंगली. नांदेड येथील प्रसिध्द गायक सूरमणी पं. धनंजय जोशी यांनी आपल्या सुमधूर गीतानं ‘भक्तीनाट्यधारा’
मैफिलीत संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केलं. साथसंगत हार्मोनियम श्री सद्गुरू संगीत विद्यालयाचे संचालक निलेश मेस्त्री, मंगेश मेस्त्री, तबलावादक किशोर सावंत, निरज भोसले यांनी तर झांज भास्कर मेस्त्री, केतकी सावंत यांनी साथसंगत केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संजय कात्रे यांनी केल.

जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान समोरील पटांगणात रंगलेल्या या मैफिलीस सावंतावडीतील संगीत प्रेमींचा उदंड असा प्रतिसाद लाभला. याप्रसंगी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब,सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल राऊळ, कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, माजी नगरसेवक सुनील भोगटे, तातोबा गवस, पी.टी.परब, कॅप्टन दीनानाथ सावंत, कॅप्टन सुभाष सावंत, शामसुंदर सावंत, प्रा.जी.ए.बुवा, चंद्रशेखर जोशी, सावंतवाडी पतपेढीचे चेअरमन रमेश बोंद्रे, व्हा.चेअरमन संजू शिरोडकर, दीपक राऊळ, वैभव केंकरे, भरत गावडे आदी उपस्थित होते.