सावंतवाडी,दि.१७ फेब्रुवारी
सावंतवाडी सहकारी पतपेढी लवकरच शतक महोत्सवी वर्षाकडे जाणार असल्याने संस्थेच्या ठेवी शंभर कोटीपर्यंत नेण्याचा मनोदय संस्थेचे नूतन अध्यक्ष रमेश बोंद्रे यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी सहकारी पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीनंतर पतपेढीचे अध्यक्षपदी रमेश बोंद्रे आणि उपाध्यक्षपदी संजीव शिरोडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना रमेश बोंद्रे म्हणाले ,शतक महोत्सवी वर्षाकडे सावंतवाडी सहकारी पतपेढी जाणार असल्याने संस्थेच्या ठेवी शंभर कोटीपर्यंत नेण्याचा मनोदय व्यक्त करून ठेवीदार ग्राहक आणि कर्जदार यांना चांगल्या सुविधा देण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.
यावेळी संचालक अँड गोविंद बांदेकर, उमाकांत वारंग ,दत्ताराम सावंत, शरद सावंत, देवेंद्र तुळसकर, यल्लाप्पा नाईक, सदानंद जाधव, सौ सीमा मठकर ,सौ मनीषा मिशाळ ,सौ किशोरी कुडतरकर, श्रीमती वैष्णवी बांदेकर, व्यवस्थापक नारायण तेंडोलकर व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी सावंतवाडी पतपेढीची आतापर्यंतची वाटचाल कौतुकास्पद असल्याचे माजी अध्यक्ष अँड गोविंद बांदेकर यांनी सांगितले तसेच पतसंस्थेच्या सर्व संचालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.