मसुरे कावावाडी येथे २२ रोजी धार्मिक कार्यक्रम

0

मसुरे, दि .१२ जानेवारी (झुंजार पेडणेकर)

अयोध्या नगरीत २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांच्या (रामलल्ला) भव्य मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या अलौकिक तथा ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने श्री रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र न्यास, अयोध्या, उत्तरप्रदेश यांच्या आवाहनानुसार मसुरे कावावाडी येथील श्री देव हनुमान मंदिरात २२ जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यानिमित्त सकाळी १० वा
“श्रीं” च्या चरणी अभिषेक
सकाळी ११वा.
किर्तन बुवा ह.भ.प. अक्षय परुळेकर, मालवण, दुपारी १ वा.
आरती व तिर्थप्रसाद, दुपारी ३ ते ५ वा. हळदीकुंकू समारंभ,
सायंकाळी ७ वाजता
दिपोत्सव, रात्री ९ वा
स्थानिक भजन आदी कार्यक्रम होणार आहेत.
उपस्थितीचे आवाहन
भंडारी समाज सेवा संघ, मसुरे, कावावाडी यांनी केले आहे.