श्रीराम वाचन मंदिर येथे २ मे ते ४ मे रोजी अनोखं चित्रप्रदर्शन आयोजित

सावंतवाडी दि.३० एप्रिल 
सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे शुक्रवार २ मे ते रविवार ४ मे रोजी एक अनोखं चित्रप्रदर्शन आयोजित होत आहे.

ज्येष्ठ चित्रकार (राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित) आणि दत्त भक्त तसेच संतचरित्राचे गाढे अभ्यासक हरेकृष्ण भगवान पोळजी (आसोली), त्यांचे बंधू विश्राम भगवान पोळजी आणि सावंतवाडी येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ नेत्रा सावंत यांची निसर्ग चित्र या प्रदर्शनात समाविष्ट असतील.

दत्तभक्त हरेकृष्ण भगवान पोळजी यांची गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षांची चित्रकलेची साधना आहे.
नृसिंहवाडी, देहू, आळंदी सह राज्यातील व देशातील अनेक तीर्थक्षेत्री त्यांची चित्रे तेथील मंदिरात अर्पण करण्यात आलेली आहे.
त्यांना वयाच्या दहाव्या वर्षी उत्कृष्ट चित्रकार म्हणून राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.त्यांचे कनिष्ठ बंधू विश्राम पोळजी हे देखील उत्तम चित्रकार व मुर्तीकार असून सदर प्रदर्शनात त्यांचीही चित्रं असणार आहेत.
सावंतवाडी येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ नेत्रा सावंत या देखील चित्रकलेत निपुण कलाकार आहेत, त्यांची अनेक निसर्गचित्र या प्रदर्शनात समाविष्ट आहेत.

शुक्रवारी २ मे रोजी सकाळी ११ वाजता या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे.

सावंतवाडी शहरातील तसेच जिल्ह्यातील चित्रप्रेमी रसिकांनी अशा आगळ्यावेगळ्या चित्रप्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.