कणकवली दि.१७ फेब्रुवारी(भगवान लोके)
गोव्याहून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रक ( MH 08 – AP 3940) ने रस्त्याच्या बाजूला उभी असलेल्या स्विफ्ट कार ( MH 05 -CV – 4169 ) ला जोरदार धडक देत कारचे नुकसान केले. हा अपघात 16 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजून 45 मिनिटांनी मुंबई गोवा हायवेवर ओसरगाव बोर्डवे फाटा येथे घडला.
विशाल विलास सावंत ( रा. बदलापूर ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची स्विफ्ट कार रस्त्याच्या बाजूला उभी होती.त्यावेळी गोव्याहून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या ट्रक ची जोरदार धडक स्विफ्ट कारला मागून बसली.यात कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. हवालदार चंद्रकांत झोरे यांनी अपघातस्थळी जात पंचनामा केला.ट्रकचालक प्रितेश राजेश देसाई ( रा.लांजा ) याच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार मनोज गुरव करत आहेत.