भिरवंडे श्री देव रामेश्वर चरणी साडेसात किलो चांदीची “प्रभावळ “

जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व संजना सावंत कुटुंबीयांनी केलं दान

कणकवली दि.१७ फेब्रुवारी(भगवान लोके)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिरवंडे रामेश्वर मंदिर मध्ये जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व सौ. संजना सावंत आणि त्यांची मुलगी सलोनी सावंत यांच्या कडून रथसप्तमी च्या शुभ मुहूर्तावर सुरु होत असलेल्या हरीनाम सप्ताह चे औचित्य साधून रामेश्वर चरणी साडेसात किलो चांदीची ” प्रभावळ ” दान करण्यात आली. यावेळी मनोहर सावंत, महेंद्र सावंत बाबाजी उर्फ दादा मटकर सावंत, सुनील सावंत व इतर मानकरी व भिरवंडे ग्रामस्थ उपस्थित होते. संदेश सावंत व संजना सावंत यांनी भिरवंडे रामेश्वर मंदिराला साडेसात किलो चांदीची “प्रभावळ ” दान केली याबद्दल भिरवंडे वासियांनी संदेश सावंत व संजना सावंत, सलोनी सावंत यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला.