आचरा सरकारमान्य रास्त धान्य दुकानात आनंदाच्या शिध्याचे वाटप

आचरा,दि.१७ फेब्रुवारी(अर्जुन बापर्डेकर)
रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठापण सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार तर्फे सरकार मान्य रास्त दराच्या धान्य दुकानावर आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे. आचरा गाउडवाडी येथील रास्त दराच्या धान्य दुकानावर आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सोसायटी चेअरमन अवधूत हळदणकर,संचालक लवू मालंडकर, जयप्रकाश परुळेकर,यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. या आनंदाच्या शिध्यामध्ये अवघ्या शंभर रुपयाला साखर,रवा मैदा पोहे,खाद्यतेल सहा जिन्नसासह साडी मिळणार असल्याचे चेअरमन अवधूत हळदणकर यांनी सांगितले.