मालवण,दि.१७ फेब्रुवारी
मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लि., मालवण संचलित मालवणी बझार मालवण चा मिरची महोत्सव आयोजित करण्यात आला असून २० फेब्रुवारी पर्यंत हा महोत्सव चालणार आहे. यामध्ये विविध प्रकारची मिरची उपलब्ध करण्यात आली असून ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
या मिरची महोत्सवाचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष प्रमोद मोहिते, संचालक शपी. एस. बागवे, संचालक जी. एम. कोकरे, संचालक एम. व्हि. परब, संचालिका सौ. जे. एस. हडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. परब, अन्य पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, ग्राहक यांच्या उपास्थितीत शुक्रवारी करण्यात आला. हा मिरची महोत्सव दि. २० फेब्रुवारी पर्यंत सकाळी ८.३० ते सायं ६.३० या वेळेत सुरु राहणार आहे. यामध्ये बॅडगी, रायचूर, तेजा अशी विविध प्रकारची दर्जेदार मिरची व गरम मसाला सामान माफक दरात उपलब्ध करण्यात आले आहे. नागरिकांनी या मिरची महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रमोद मोहिते यांनी केले आहे.