मालवण,दि.१७ फेब्रुवारी
मालवण सोमवार पेठ येथील संत गुरु रविदास नगर येथे संत गुरु रविदास जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे मालवण शहर अध्यक्ष गणेश पाडगावकर यांच्यावतीने समाजातील पारंपारिक चर्म व्यवसाय करणाऱ्या रमेश पाडगावकर, गुरुनाथ चव्हाण, दत्तराम माणगावकर यांचा प्रतिमा व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी संत गुरु रविदास यांच्या प्रतिमेला समाजातील होतकरू महिला व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सर्व प्रभाग प्रतिनिधी यांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. सायंकाळी हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला.
यावेळी सिंधुदुर्ग चर्मकार समाज उन्नती मंडळाचे माजी उपाध्यक्ष सुधाकर माणगावकर, बाळकृष्ण माणगावकर. माणगावकर, नाना माणगावकर, वेदा माणगावकर, वैभव माणगावकर, प्रमिला माणगावकर, माली आडवलकर, सुमन आडवलकर, सौ. आडवलकर, विनायक भिलवडकर. दीपक भिलवडकर, तालुकाध्यक्ष हरेश चव्हाण, प्रभाग अध्यक्ष श्याम चव्हाण, सचिव देवेंद्र चव्हाण. राजन माणगावकर, विकी माणगावकर, विश्वास चव्हाण आदी उपस्थित होते.