मुंबईस्थित कुडाळ- मालवणवासीयांची २१ रोजी शिवसेना भवनात बैठक

मालवण,दि.१७ फेब्रुवारी

शिवसेना ठाकरे गटातर्फे कुडाळ-मालवण मतदारसंघातील मुंबईत वास्तव्यास असलेले चाकरमानी, ग्रामविकास मंडळांचे सदस्य व शिवसैनिक यांची बैठक दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबईत शिवसेना भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीला शिवसेना उपनेते अरुण दूधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर व संजय पडते, विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश पाटील, कुडाळ संपर्कप्रमुख बाळा म्हाडगूत, महिला विधानसभा संपर्कप्रमुख अपूर्वा प्रभू हे मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण, विरार, वसई आदी भागात वास्तव्यास असलेल्या मुंबईस्थित कुडाळ- मालवणवासीयांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहवे, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी स्वीय सहाय्यक अनंत पाटकर (९०११९९५५०३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.