पडेल येथील श्री विठ्ठल मंदिरात २२ जाने.. रोजी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन!

0

देवगड, दि .१२ जानेवारी
अयोध्या येथील श्रीराम मंदिरप्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल मंदिर पडेल येथे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीस अभिषेक व पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत प्रभू श्री रामचंद्र यांची विधिवत पूजा आणि अभिषेक दुपारी १२ ते १ अयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण ,दुपारी १ नंतर तीर्थप्रसाद, दुपारी ३ वाजता श्री भावका देवी भजन मंडळ दडदडे वाडी यांचे सुश्वाव्य भजन बुवा सुधीर वारीक, सायंकाळी ४.३० वाजता श्री गवळदेव प्रासादिक भजन मंडळ हेमलेवाडी यांचे सुस्वर भजन, बुवा सुधीर हेमले सायंकाळी ६ ते ६.३० दीपोत्सव, सायंकाळी ६.३० ते ८.३० किर्तन, युवा कीर्तनकार ह भ प सदाशिव पाटील कुडाळ, हार्मोनियम साथ राजेंद्र पाटणकर, तबला साथ प्रणव पाटणकर याप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .तरी या सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.