जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के व सचिव राजन पांचाळ यांचे नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन

सावंतवाडी,दि.१७ फेब्रुवारी

सन 2022 23 या वर्षासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार पडताळणी तपासणी करता जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीवर चार सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के व सचिव राजन पांचाळ सहाय्यक ग्रंथालय संचालक मंजुषा साळवे व जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे असे चार जणांची समिती आहे ही समिती पुरस्कार पडताळणी व तपासणी करणार आहे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के व सचिव राजन पांचाळ यांचे नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.