दिगवळे रांजणवाडी येथील म्हाय जत्रा २३रोजी

आचरा,दि.१७ फेब्रुवारी(अर्जुन बापर्डेकर)
दिगवळे रांजणवाडी येथील जागृत देवस्थान श्री भैरी ब्राह्मण म्हाय जत्रा शुक्रवार २३फेब्रूवारी रोजी माघ शुद्ध पौर्णिमेला संपन्न होत आहे.भैरवगडाच्या पायथ्याशी राख क्षेत्रात संपन्न होणाऱ्या या जत्रेची अपूर्वाई पाहण्यासाठी आणि असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या या देवतांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री भैरी ब्राह्मण म्हाय जत्रोत्सव समिती अध्यक्ष राजन कदम, सचिव प्रदिप सावंत, खजिनदार अनिल कदम यांनी केले आहे.